धाराशिव (प्रतिनिधी)- माला विषयीचे गुन्हे उघडकीस आणणे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक पेट्रोलिंग करत पोस्ट कळंब हद्दीत असताना गुप्त बातमीवरून संशयित आरोपी दिगंबर संदिपान काळे, वय 25 वर्ष, रा. आंदोरा ता. कळंब जि. धाराशिव याने कळंब परिसरात चोरी केली असून त्यातील मुद्देमाल घराच्या जवळील शेतात लपवून ठेवला आहे. अशी बातमी मिळाल्यावर घरफोडीतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपीस सिताफिने ताब्यात घेऊन त्याचेकडून मुद्देमाल हस्तगत करून त्याचेकडे सदर बाबत चौकशी केली असता त्याने पोस्टे कळंब हद्दीत निखिल एंटरप्राइजेस, कळंब येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यावरून पोस्टे कळंब गुन्हे अभिलेख पाहिले असता गुरनं 280/25 अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावरून तात्काळ पंचनामा करून नमूद गुन्ह्यातील 2 लाख 24 हजार 298 रुपये किंमतीचे दुकानातून चोरीस गेलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि 2000 मीटर अल्युमिनियम तार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात असलेल्या आरोपीने त्याच्या अन्य साथीदाराच्या मदतीने सदरचे गुन्हा केल्याचे कबुली दिली. नमुद आरोपीस पुढील कार्यवाही कामी पोलीस ठाणे कळंब येथे हजर केले आहे.
सदरची कामगीरी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सपोनि सुदर्शन कासार,पोह शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फराहान पठाण, चापोका रत्नदीप डोंगरे, चापोका बाबासाहेब गुरव यांच्या पथकाने केली आहे.