तुळजापूर (प्रतिनिधी)- महाविकास आघाडीचे नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या देवीदर्शनानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रकाराचा आघाडीने निषेध केला. ॲड. धीरज पाटील, सुधीर कदम, धर्यशिल पाटील, ऋषी मगर, अमोल कुतवळ, रणजित इंगळे व मधुकर शेळके यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली.
नेत्यांनी सांगितले की, “आधी कधीही असा प्रकार तुळजापूरमध्ये घडला नाही. महायुतीतील नेते येथे येतात, विचारभिन्नता असली तरी आम्ही गोंधळ घालत नाही. मात्र यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल.“ भाजपवर तिर्थक्षेत्र तुळजापूरची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला. आव्हाड यांना अडवताना पोलिसांची भूमिका निष्काळजीपणाची असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच, “मंदिर हे 11 व्या शतकातील आहे, जिर्णोद्धार करताना पुरातत्व खात्याची परवानगी दाखवावी व मंदिराला धक्का न लावता काम करावे, त्याला आमचा विरोध नाही,“ असेही स्पष्ट केले.