परंडा (प्रतिनिधी)- तालुक्यात भ्रष्टाचार झालेल्या कामांची चौकशी व्हावी यासाठी रंगनाथ भीमराव ओव्हाळ यांनी सुरू केलेले आमरण उपोषण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते माजी नगरसेवक राहुल बनसोडे यांच्या प्रयत्नाने मागे घेण्यात आले.
उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण उपविभाग परंडा यांच्या कार्यालयासमोर आज दि.14 ऑगस्ट रोजीअमरण उपोषण सुरू केले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिलेल्या लेखी आश्वासनाद्वारे हे अमरण उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी नगरसेवक राहुल बनसोडे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बिभिषण खुणे, रोसा सरपंच अश्रू नलवडे , राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल चे नेते घनश्याम शिंदे, दीपक ओहाळ, पोलीस हवालदार नितीन गुंडाळे , मृद् व जलसंधारण कर्मचारी आर.बी.गायकवाड उपस्थित होते.