धाराशिव (प्रतिनिधी)- बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत असणाऱ्या दत्तक गावातील महिला बचत गटातील सदस्यांना बँकेच्या वतीने कोट्यावधी रुपये कर्ज वाटप केले जात आहे. याचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे असे प्रतिपादन क्षेत्रीय प्रबंधक संजीव कुमार यांनी केले.बँक ऑफ महाराष्ट्र सोलापूर झोनल ऑफिस अंतर्गत धारशिव जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्र बैंक शाखे अंतर्गत 306 महिला बचत गटाना 15 कोटी 7  लाख रु कर्ज वाटप कार्यक्रम धाराशिव  येथील जिल्हाधिकारी कार्यालय भवन येथे (ता. 13) बुधवार रोजी सकाळी 11 वाजता संपन्न झाला. दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या 306 महिला बचत गटातील शेकडो महिला उपस्थित होत्या. यावेळी बोलताना क्षेत्रीय प्रबंधक संजीव कुमार म्हणाले की, प्रधानमंत्री जीवन जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, अटल पेन्शन योजना, यांचा लाभ घ्यावा व त्या संबंधी माहिती सांगितली. कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मौनीक घोष , क्षेत्रीय प्रबंधक संजीव कुमार,क्षेत्रीय उपप्रबंधक सुजित झा,कृषी विभागप्रमुख वैभव घाडगे, राजेश कुशवा, महेंद्र कुमार, बीडीओ दीपक आदटराव , कृषी अधिकारी आबासाहेब भागवत,शाखा व्यवस्थापक अजय चौहान, राहुल सुरवसे,धीरज बिडवे, सुजित कुमार,धनंजय लंगोटे  व इतर शाखा व्यवस्थापक उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपक आदटराव यांनी केले तर आभार अविनाश लामतूरे यांनी मानले.


“ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशन योजनांकरीता 3 महिन्यांसाठी पुर्ण व्याप्ती मोहीम 1 जुलै ते 30 सप्टेंबर बैंक ऑफ महाराष्ट्र भारत सरकार का उद्यम एक परिवार एक बैंक 2.70 लाख ग्रामीण आणि शहरी स्थानिक संस्थांमध्ये या मोहीमेअंतर्गत खालील घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

सर्व निष्क्रिय बचत खात्यांची  KYC पुनःपडताळणी प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत बँकेचे खाते नसलेल्या प्रौढ व्यक्तींकरिता नवे बँक खाती उघडणे, धानमंत्री जीवन ज्योती विमा योजना  (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY)  अंतर्गत नोंदणी, अटल पेन्शन योजना (APY) अंतर्गत नोंदणी डिजिटल फसवणूक प्रतिबंध आणि दावा न केलेल्या ठेवींबद्दल जागरूकता, अधिक माहितीसाठी, आपल्या नजीकच्या बँक शाखेशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले“.

 
Top