वाशी (प्रतिनिधी)- विद्यापीठ अनुदान आयोग,शिक्षण मंत्रालय भारत सरकार व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजी नगर यांच्या निर्देशानुसार सर्व वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयांना १२ ऑगस्ट रोजी अँटी रॅगिंग डे पाळण्याचे निर्देश दिले आहेत.या अनुषंगाने १२ ते १८ ऑगस्ट २०२५ दरम्यान अँटी रॅगिंग सप्ताह कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय ,वाशी येथे साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस स्टेशन वाशी चे पीएसआय अजयसिंग भाळे व ऍड.एस.आर देशमुख मॅडम तर अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.अशोक कदम हे लाभले. 

अजयसिंग भाळे यांनी सांगितले कि, सध्याच्या काळात मैत्रीपूर्ण जीवन गरजेचे आहे तसेच आपल्या सहकार्यांना आपल्या सोबत घेऊन चलण्यासाठी आपण एकत्र आलेलो असतो आपले मित्र हे आपले खरे विश्वासू आणि आनंदी जीवन जगण्यासाठी गरजेचे असतात असे ते म्हणाले. 

 ऍड.एस.आर .देशमुख म्हणाल्या कि, जाणीव जागृती करणे परस्परात मैत्री निर्माण करणे यासाठी महाविद्यालय महत्वाचे असते.पालक, शिक्षक, मित्र, आईवडील,संस्था शाळा महाविद्यालय हे संस्कारांचे स्रोत आहेत.१९९९ च्या मुंबई अधिनियम रॅगिंग कायदा काय आहे यासंदर्भात माहिती दिली. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. अशोक कदम म्हणाले कि, मैत्रीची ओळख समजून घ्या विश्वासू नाते निर्माण करा व आनंदी जीवन जगणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. विचार आचार पोशाख या सर्वाना समजून घेणारा तो खरा मित्र असतो हीच मैत्री टिकते असे ते म्हणाले.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शामसुंदर डोके यांनी केले.सुत्रसंचलन प्रा.सूर्यकांत खटींग तर आभार प्रा.कृष्णा थोरात यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

 
Top