धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे वतीने जिल्हास्तर ज्युनिअर ऍथलेटिक्स स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल धाराशिव येथे नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत एकलव्य विद्या संकुल मंगरूळ यमगरवाडी येथील दोन विद्यार्थ्यांनी यश मिळवले व त्यांचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

यामध्ये ज्योतीराम पवार व विश्वजीत जाधव यांनी मोलाची कामगिरी केली आहे व हे यश संपादन केले. पुढील राज्यस्तरीय स्पर्धा पुणे येथे होणार आहेत. ज्योतीराम पवार व विश्वजीत जाधव यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल खेळाडू तसेच क्रीडा विभाग प्रमुख माऊली भुतेकर ,बालाजी क्षीरसागर यांचे भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव काळे, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, सचिव विवेक अयाचित, नरेश जी पोटे, परेश मांगलीक तसेच राहुल चव्हाण,प्रतिष्ठानचे सदस्य अशोक संकलेचा , नाना शिर्के,ॲड.जनक पाटील, डॉक्टर प्रणिता गडेकर, राजाभाऊ गिजरे, डॉ. पुरी, ॲड परदेशी, नरसिंग झरे यांनी खेळाडूंचा सत्कार केला. यावेळी विठ्ठल म्हेत्रे अण्णासाहेब कोल्हटकर उपस्थित होते.

 
Top