परंडा (प्रतिनिधी) - परंडा तालुक्यातील शेळगाव येथील माणिकबाबा विद्यालयातील विश्वल कोकणे, कार्तिकी दैन,ऋतुजा मोरे या तीन विद्यार्थीनींचा पहिल्याच फेरीत एमबीबीएस प्रवेश निश्चित झाला, त्या निमित्ताने प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने त्या तिन्ही कन्यारत्नांचा फेटा बांधून,शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या तिन्ही कन्यारत्नां पैकी विशेष बाब म्हणजे कार्तिकी दैन ह्या विद्यार्थीनीची,तिचे आईवडील अगदी अल्प शिक्षीत,मुलीचा अभ्यास कसा चालला आहे, तिला काय अडचणी आहेत याबाबत पूर्णतःअनभिज्ञ, कागदपत्रे काय लागतात याचीही कल्पना नाही. घराला कुठलाही शैक्षणिक वारसा नाही, फक्त मुलीची जिद्द,चिकाटी,अथक परिश्रम करण्याची तयारी यातूनच कार्तिकी दैन हिने यश संपाद केले.तिन्ही कन्यारत्नांनी यशाला गवसणी घातली, या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
या सत्कार प्रसंगी प्रहार शिक्षक संघटना राज्य सचिव वैजिनाथ सावंत, जिल्हा कोषाध्यक्ष रघुनाथ दैन,अंकुश हुरकुडे,अकबर शेख,पालक रंगनाथ कोकणे,जोतीराम दैन, विलास मोरे, माजी सरपंच डिगांबर मोरे आदि मान्यवर उपस्थित होते.