परंडा (प्रतिनिधी) - वंचित बहुजन आघाडी जिल्हा पक्ष संघटन आढावा बैठक तुळजापूर येथे जिल्हा निरीक्षक अविनाश भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां साठी वंचित बहुजन आघाडी पक्षाची धाराशिव जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी पक्षाची ताकद संपूर्ण आढावा याप्रसंगी घेण्यात आला.
शनिवारी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये वंचित बहुजन आघाडीची धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती व संभाव्य नगरपंचायत,नगरपरिषद,पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्यापक स्वरूपात बैठक संपन्न झाली या बैठकीसाठी पक्षाचे जिल्हा निरीक्षक अविनाश भोसीकर,जिल्हा प्रभारीॲड.रमेश गायकवाड,युवक आघाडी जिल्हा निरीक्षक अमोल लांडगे,जिल्हाध्यक्ष ॲड.प्रणित डिकले,जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के उपस्थित होते.
याप्रसंगी धाराशिव जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्याचा निर्धार करण्यात आला जिल्ह्यातील वंचित शोषित पीडित समाज घटकांच्या न्याय हक्क अधिकारांसाठी लढणारा वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे. सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी सातत्याने निवेदने आंदोलने पक्षाच्या माध्यमातून करून पक्ष कायम सर्वसामान्यांच्या बाजूने उभा राहतो सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी लढवणार असा निर्धार या बैठकीमध्ये करण्यात आला याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष आर.एस.गायकवाड,नासिर शेख,रविकिरण बनसोडे,रुस्तमखा पठाण,जिल्हा संघटक विकास बनसोडे,परमेश्वर लोखंडे,प्रवक्ता ॲड. के.टी.गायकवाड,शिवाजी कांबळे,उमेशकांबळे,अमोल शेळके,वंचित बहुजन माथाडी कामगार जनरल युनियन जिल्हाध्यक्ष सुधीर वाघमारे,युवा आघाडीचे गोविंद भंडारे,जीवन कदम,विनायक दुपारगुडे,माजी जिल्हाध्यक्ष बि.डी.शिंदे,मिलिंद रोकडे,रामभाऊ गायकवाड,भारतीय बौद्ध महासभेचे उमाजी गायकवाड,समता सैनिक दला च्या आम्रपाली बसवराज गोतसुर्वे,पंकज सोनकांबळे,नितीन सीतापुरे सहदेव कांबळे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी शनिवारी सातत्याने पाऊस चालू असताना देखील बैठकीसाठी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक धनंजय सोनटक्के यांनी केले सूत्रसंचालन गोविंद भंडारे तर आभार प्रदर्शन जीवन कदम यांनी केले.