तेर (प्रतिनिधी)-  धाराशिव तालुक्यातील तेर जवळील तेरणा धरण 14 ऑगस्टला सायंकाळी मुसळधार पाऊस पडल्याने 15 ऑगस्टला पाण्याने पूर्णपणे भरून वाहू लागले आहे.

धाराशिव तालुक्यातील तेर जवळील तेरणा धरण 1964 ला बांधण्यात आले. तर 1993 ला धरणाची तीन फूट उंची वाढवण्यात आली. धरणातील पाण्याचा      धाराशिव शहर, तेर, ढोकी, कसबे तडवळे, येडशी गावाला पाणीपुरवठा केला जातो. आतापर्यंत तेरणा धरण 2008, 2010, 1016, 2017, 2018, 2019, 2021, 2022, 2024 या वर्षात पाण्याने पूर्णपणे भरलेले आहे. तेरणा धरणाचा एकूण पाणी साठा 20.554 दशलक्ष घनमिटर असून 19.663 दशलक्ष घनमिटर उपयुक्त पाणीसाठा साठला जातो. याच धरणात 896 दशलक्ष घनमिटर मृत साठा आहे. तेरणा धरणाचा डावा कालवा 15 किलोमीटर तर  उजव्या कालवा 16 किलोमीटर आहे. धरण व दोन्ही डाव्या व उजव्या कालव्यावर 1652 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. 14 ऑगस्टला सायंकाळी मुसळधार पाऊस पडल्याने 15 ऑगस्टला तेरणा धरण पाण्याने पूर्णपणे भरून वाहू लागले आहे.

 
Top