धाराशिव  (प्रतिनिधी) - तालुक्यातील रामलिंग दर्शनस्थळी वाहनांच्या पार्किंगची पट्टी का देत नाहीस ? असे म्हणत हुज्जत घालीत मारहाण केली तर. त्याच दिवशी  गुंडांनी रात्री ११ वाजता घरी येऊन घरातून ओढीत नेत लोखंडी रॉड व धारदार शस्त्रांनी डोक्यावर, मानेवर, जांघेत व इतर ठिकाणी वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत.. ही घटना दि.११ ऑगस्ट रोजी घडली असून याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस विभागाच्या वतीने शनिवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या प्रेस नोट मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. अद्याप काही आरोपीला अटक न केल्यामुळे तीव्र संतापव्यक्त केला जात आहे

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव तालुक्यातील येडशी येथील संकेत धनाजी कदम (वय - २१ वर्षे) हे सोमवार दि.११ ऑगस्ट रोजी येडशी येथील तीर्थस्थळ असलेल्या रामलिंग मंदिर येथे दर्शनासाठी गेले होते. त्या ठिकाणी पार्किंगसाठी पावती फाड असे म्हणत कृष्णा लोमटे, शंकर गडकर व राहुल गडकर रा. तुगाव यांनी संकेतला पैसे मागितले. परंतू, येडशी येथील स्थानिकांना पार्किंग साठी पैसे आकारले जात नाहीत. त्यामुळे संकेतने मी येडशीचा आहे असे सांगत पैसे देण्यास नकार दिला. तुझ्या कपाळावर येडशीचा असल्याचा शिक्का मारलाय का ?  अशी जातीवाचक शिवीगाळ करुन गुंडगिरीची व उर्मट भाषेत वापरत त्या दोघांनी संकेतला मारण्यास सुरुवात केली. यावेळी तुषार शहाजी शिंदे रा.in  येडशी याने देखील सहभागी होत तुषारला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. पैसे देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून त्याच रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तुषार शहाजी शिंदे, गोटू मोरे, अजय भोसले, दिनेश चव्हाण, प्रवीण मांगडे, तुषार उर्फ अण्णा शिंदे, रा. येडशी तर शंकर गडकर, राहुल गडकर, कृष्णा लोमटे रा. तुगाव, प्रकाश मुंडे रा. वडगांव व इतर पाच ते सहा गुंडांनी संकेत धनंजय कदम हे रात्री ११ वाजता येडशी येथील रामलिंग नगरमधील त्याच्या घरी झोपला होता. गुंड संकेतच्या घरी आले. त्यापैकी एकाने दरवाजावर थाप मारुन संकेत घरी आहे का ? असे विचारल्यामुळे संकेतच्या आई दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच वरील गुंडांनी घरात घुसून संकेतला घराबाहेर ओढीत नेत त्यांनी लोखंडी रॉड व इतर धारदार शास्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात संकेतच्या डोक्याला, मानेवर, जांगेत व इतर ठिकाणी जबर मारहाण केली. त्यामुळे ते जबर जखमी झाले आहेत. मारहाण सुरू असताना संकेतची आई मिराबाई धनाजी कदम व त्याची बहीण साक्षी मस्के या सोडवित असताना त्या गुंडांनी त्या दोघींना बेदम मारहाण केली. आईला लता बुक्क्यांनी जबर चेहऱ्यावर मारहाण केल्यामुळे त्यादेखील रक्तबंबाळ झाल्या. तर बाळांतीन असलेल्या बहिणीला देखील चापटांनी मारहाण केली.  तुषार शिंदे याने संकेतला जिवंतच मारणार असल्याची धमकी दिली.. याप्रकरणी संकेत कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरुन धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार ११८ (१), ११५ (२), ३३३, १८९ (२), १९१ (२), १९१ (३) सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ ३ (१) (r), ३ (१) (s) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे‌. घटना घडून ५ दिवस उलटून गेले तरी अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

 
Top