धाराशिव (प्रतिनिधी)- पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी रात्री धाराशीवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक शफकत आमना, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेश चौहान,आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गंगासागरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सरनाईक यावेळी म्हणाले की,  हॉस्पिटल परिसरात पोलीस चौकी आणि सुरक्षारक्षक असताना या परिसरात हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहे,ही अत्यंत गंभीर बाब आहे.तातडीने याबाबतची दखल घेऊन सुरक्षाविषयक सुधारणा पोलीस विभाग आणि हॉस्पिटल प्रशासनाने कराव्यात.अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. पोलिसांच्या सुरक्षा चौकीचा वचक हॉस्पिटल परिसरात वावरणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर असला पाहिजे. गुंड प्रवृत्तीचे लोक हॉस्पिटल परिसरात दिसू नये.अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करून त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी,असे त्यांनी सांगितले.

यावेळी शासकीय महाविद्यालयाचा नवीन इमारतीसाठी लागणारी जागा व त्यासाठी उपलब्ध निधीची माहिती अधिष्ठाता श्री. चौहान यांनी दिली.  शासकीय . महाविद्यालयाच्या सादरीकरणातून हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात १४ बेडची व्यवस्था,रेफर टू सोलापूरचे प्रमाण कमी झाले, एका वर्षात मृत्यूदरास ५० टक्के घट झाली आहे असे सांगितले

 
Top