भूम (प्रतिनिधी)- संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी ( 750 ) वी जयंती वर्ष भूम नगर परिषद च्या वतीने शहरांमधून ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी काढून साजरी करण्यात आली.  

भूम नगर परिषद कार्यालयाकडून श्री संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून महादेव मंदिर भजनी मंडळ,जगदंबा भजनी मंडळ , मुक्ताई भजनी मंडळ,चौंडेश्वरी भजनी मंडळ  भूम नगर परिषदेतील सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये भुम नगरपरिषद येथून , मेन रोड ,गांधी चौक , गोलाई चौक पालखी काढण्यात आली .यावेळी वारकरी संप्रदायाचे भजन मंडळाचे वारकरी ,महिला भजनी मंडळ ,भजन करत ,हरिनामाचा जागर करत शहरातून हा पालखी सोहळा काढण्यात आला .यावेळी नगर अभियंता गणेश जगदाळे ,तुकाराम माळी ,रवींद्र भोसले ,कुणाल गायकवाड ,ज्ञानेश्वर टकले ,प्रकाश गाढवे  , प्रवीण गाडे , सुमीत जाधव , प्रदीप नाईकवाडी , शिराळकर मॅडम ,  यांच्यासह नगरपरिषद चे कर्मचारी वारकरी उपस्थित होते.


 
Top