धाराशिव (प्रतिनिधी)- नूतन प्राथमिक विद्यामंदिर, येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी *रोटरी क्लब धाराशिव व नूतन प्राथमिक विद्यामंदिर,धाराशिव आयोजित पर्यावरण पूरक मातीच्या गणपती मूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या ऐवजी शुद्ध मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे मार्गदर्शन देण्यात आले.
या कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या हातांनी सुंदर, आकर्षक व पर्यावरणपूरक गणपती मूर्ती घडवल्या. कार्यशाळेमध्ये पर्यावरण तज्ञांनी विद्यार्थ्यांना “आपला सण, आपली जबाबदारी” हा संदेश देत निसर्गसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर अण्णा पाटील संस्थेच्या सरचिटणीस सौ.प्रेमाताई पाटील,रोटरी क्लबचे अध्यक्ष रणजीत रणदिवे,सचिव प्रदीप खामकर,अभिजीत पवार पर्यावरण गणेश मुर्ती तयार करण्यासाठी प्रशिक्षक म्हणून कलाध्यापक शेषनाथ वाघ यांनी मातीपासून मुर्ती तयार करुन विद्यार्थ्यांना दाखविले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोरे उपस्थित होते. कार्यक्रमात शिक्षक शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जाणीव वाढली असून आगामी पिढीला हरित संदेश मिळाला.“मातीच्या गणपतीत आहे भावनांची शुद्धता आणि पर्यावरणाची जपणूक!“