भूम (प्रतिनिधी)- नोंदणी व मुद्रांक विभागाचे दुय्यम निबंधक कार्यालय भूम येथे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताहानिमित्त भूम तालुक्यातील माजी सैनिक यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सहदुय्यम निबंधक अधिकारी सागर राऊत यांनी कार्यालयीन कामकाजाची माहिती उपस्थितांना दिली. नागरिकांना शासकीय कामकाजाची व दाखले वितरणाची माहिती देणे व जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले. यावेळी कार्यालयाचे वतीने माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष हेमंत देशमुख, सचिव प्रभाकर हाके, कार्याध्यक्ष प्रल्हाद कुटे, कोषाध्यक्ष दादाराव जाधव, प्रवक्ता ॲड. भगवानराव नागरगोजे, मधुकर वाघमोडे, नामदेव माने, बाळराजे पाटोळे, नाना गव्हाणे, रामराजे डोके, तानाजी अंधारे, दत्ता पवार, पांडुरंग खोसे, दासराव पवार, शहाजी पगारे, राजाराम वाघमारे, दत्तात्रय गिलबिले, साहेबराव झोरे, प्रमोद जाधव, नारायण जाधव, दादाहरी तेलंगे, प्रभाकर वरबडे, शिवाजीराव चव्हाण, भगवानराव धुमाळ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ॲड.शिवाजीराव पवार, ॲड. प्रीतम आहेरकर, ॲड. दत्तात्रय चिकने, ॲड. योगेश खंडागळे, ॲड. प्रशांत पंडित, ॲड. रामराजा पंडित, मुद्रांक विक्रेते हर्षवर्धन लोखंडे, पक्षकार युवराज वरवडे, अजिनाथ काटे, संगणक सहाय्यक रोहित कांबळे व किरण सरवदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष बाबर यांनी केले.