भूम (प्रतिनिधी)-  अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर तातडीने कार्यवाही करून घेणार असल्यामुळे पंचनामा प्रक्रियेची कार्यवाही तातडीने करावी. अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे भाजपचे राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षिरसागर यांच्या शिष्टमंडळाने केली आहे. 

धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक अतिवृष्टीमुळे नुकसान भूम तालुक्यात प्रत्येक गाव परिसरात झाली आहे. यामुळे प्रत्येक शेतकरी आर्थिक दृष्ट्या कोंडीत सापडला आहे, नुकसानग्रस्त भागाची पाहणी जिल्हाधिकारी आणि माजी मंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन केली आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा गतीने केला जाणार आहे. यामुळे पंचनामा करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. अशी मागणी भाजपाचे राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षिरसागर,  तालुका अध्यक्ष  संतोष सुपेकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिष्ठमंडळाद्वारे भूम उपविभागीय अधिकारी यांचेकडे दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी केली आहे.

यावेळी भूम नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याही तक्रारीचा पाढा मांडला गेला,  गणेशोत्सव सारख्या महत्त्वाच्या शांतता समितीच्या बैठकीत मुख्याधिकारी गैरहजर राहतात, आठ आठ दिवस कार्यालयात फिरकत नाहीत, तक्रारीची दखल घेत नाहीत असाही सूर लावला गेला. यावेळी सुदाम पाटील, महादेव वडेकर, रघुनाथ वाघमोडे, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, शरद चोरमले, शंकर खामकर, प्रदीप साठे, संतोष अवताडे, नितीन साठे, बापू बगाडे, सिद्धार्थ जाधव, सचिन साठे, हेमंत देशमुख, रुषीकेश खोले  माणकेश्वरचे अंधारे आदिची उपस्थिती होती.

 
Top