भूम (प्रतिनिधी)- भूममध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल. भूम पोलीस ठाण्यात गुरन क्र.196/2025 अन्वये कलम 64, 64(2)( m) भारतीय दंड संहिता तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम 4, 8, 12 प्रमाणे एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल 2025 च्या शेवटच्या आठवड्यापासून ते 10 जून 2025 दरम्यान भूम तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील राहत्या घरात आरोपीने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून दोन वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. फिर्यादी ही आपल्या भावाच्या लग्नाकरिता गावात आली असताना सदर घटना घडली असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. सदर गुन्हा सुरुवातीला फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे नोंदविण्यात आला होता. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण करून गुन्हा भूम पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.पुढील तपासासाठी हा गुन्हा पिंक पथक प्रमुख सपोनि तवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

 
Top