उमरगा (प्रतिनिधी)- दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब उमरगा यांच्या वतीने डॉ. रामानुजाचार्य इंग्लिश स्कूल उमरगा या शाळेत निबंध स्पर्धा, राख्या बनवण्याची स्पर्धा आयोजित केली होती. याचा बक्षीस वितरण समारंभ रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. प्रा. धनंजय मेनकुदळे, क्लबचे सचिव प्रा. राजू जोशी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी उप प्राचार्य श्री माळी सर, संस्थेचे संचालक श्री सुधीर अंबर, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत ,नृत्य ,लेझीम, भाषण, यामध्ये सहभाग घेऊन संपूर्ण वातावरण देशभक्तीपर गीताने भारून गेले होते. विशेष म्हणजे एल.के.जी .यु.के.जी .या छोट्या चिमुकल्याने समोर येऊन भाषण करण्याचे धाडस दाखवले याबद्दल संस्थेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. लहान वयामध्ये मुलांवरती भाषण कला चे संस्कार देणे हे काळाची गरज आहे. उमरगा रोटरी क्लबच्या वतीने या शाळेचे संचालक व शाळेतील सर्व शिक्षक वृंदाना  हार्दिक हार्दिक शुभेच्छा.


 
Top