तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील देवकुरुळी येथे शनिवार दि16 ऑगस्ट रोजी सोयाबीन शेती शाळा आयोजित करुन त्यात शेतकऱ्यांना एकात्मिक कीड व रोग नियंत्रणाचे धडे देण्यात आले.
गावातील शेतकरी आशाबाई ताकमोगे यांच्या शेतातघेण्यातआलेल्या शेती शाळेत सोयाबीन पीक परिसंस्था आणि एकात्मिक कीड व रोग नियंत्रणाविषयी सखोल माहिती देण्यात आली. यावेळी सहायक कृषी अधिकारी नवनाथ आलमले यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या नियंत्रित प्लॉट व प्रात्यक्षिक प्लॉट मधील पिकाची पाहणी केली आणि पिकाच्या वाढीचे निरीक्षण केले. आलमले यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाला होणारे रोग आणि त्यावर प्रभावी उपाययोजनांबद्दल मार्गदर्शन केले. तसेच, एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतींचा वापर करून रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी कसा करता येईल, यावरही चर्चा करण्यात आली.