धाराशिव (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी 13 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत एकमताने जाहीर करण्यात आली. नव्या नेतृत्वामुळे संघटनेच्या कार्यात उत्साहाचे नवे पर्व सुरू होणार असल्याचा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

जिल्हाध्यक्षपदी अनंत कुंभार, कार्याध्यक्षपदी संतोष नलावडे, सचिवपदी हेमंत भिंगारदेवे, तर कोषाध्यक्षपदी अमोल ताकभाते यांची निवड झाली. मार्गदर्शकपदी अनुप शेंगुलवार व रावसाहेब चकोर, तर संघटकपदी प्रशांतसिंह मरोड व मनोज राऊत यांची निवड झाली.

महिला प्रतिनिधी म्हणून सीमा गवळी व पद्मा मांजरे यांची निवड झाली. प्रसिद्धी प्रमुखपदी विनोद जाधव तर सह-प्रसिद्धी प्रमुखपदी मोहन राऊत यांची निवड करण्यात आली. सदस्य मंडळावर लक्ष्मण वाजे, ओंकार गायकवाड, जे.टी. वग्गे, बी. यु. उगलमोगले, अक्षय काळे व प्रदीप शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे. या बैठकीस राज्य सरचिटणीस व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) तुकाराम भालके उपस्थित होते.


 
Top