धाराशिव (प्रतिनिधी)- फाटक सरांची विद्याधन अकॅडमीची विद्यार्थीनी कुमारी आदिती रविकुमार गोडसे हिने राष्ट्रीय इंडियन मिलिटरी स्कूल डेहराडून (आर.आय.एम.सी.) साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे धाराशिव जिल्ह्याचा मान वाढला असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

या विद्यार्थिनीला अकॅडमीचे संचालक व माजी उपशिक्षणाधिकारी शिवाजी फाटक यांचे तसेच सायली फाटक आणि प्रियांका नागले यांचे मार्गदर्शन लाभले. सातत्यपूर्ण परिश्रम, अभ्यासू वृत्ती आणि शिक्षकांच्या प्रेरणेमुळे आदितीने हे यश संपादन केले. या उल्लेखनीय यशाबद्दल गजानन वाघमारे, मुकुंद राजेनिंबाळकर, मुकुंद रायखेलकर, सुनिल मुंडे यांच्या हस्ते आदितीचा सत्कार करण्यात आला. तिच्या या कामगिरीमुळे जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांमध्येही प्रेरणा निर्माण झाली आहे. विद्याधन अकॅडमीच्या आजवर 14 विद्यार्थ्यांनी विविध पदांवर यश मिळवले असून त्यापैकी पाच ते सहा विद्यार्थी लेफ्टनंट व सब लेफ्टनंट पदावर कार्यरत आहेत. या परंपरेत आता आदिती गोडसेनेही आपले नाव अभिमानाने नोंदवले आहे.

 
Top