सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. जगात आज सर्वच क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. अशा स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल,तर सातत्यपूर्ण अभ्यास करणे गरजेचे आहे. स्वतःचे करिअर घडवण्यासाठी विद्यार्थी आज विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देत आहेत. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एखादी नोकरी मिळवण्याचे अगर अधिकारी बनण्याचे स्वप्न आजची पिढी पाहताना दिसून येते. कोणतेही क्षेत्र असो यश प्राप्ती करून घ्यायची तर आज आपणास स्पर्धा परीक्षा दिल्याशिवाय गत्यंतर नाही. हे विद्यार्थी व पालक यांनी जाणलेले आहे. अनेक प्रकारच्या शालेय स्पर्धा परीक्षा शालेय जीवनापासून सुरू असतात जसे की जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, मंथन स्पर्धा परीक्षा, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड, राष्ट्रीय मिलिट्री स्कूल प्रवेश परीक्षा MTS,ITS,ATS,GTS,PTS,IMO,ISO अशा विविध शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी, अभ्यासक्रमाचे विश्लेषण करणे, वेळेचे योग्य नियोजन करणे, विषयांचा सराव करणे, आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.तसेच नियमितपणे सराव पेपर देऊन विद्यार्थ्यांनी आपली तयारी तपासावी.

शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी काही उपयुक्त टिप्स :-

अभ्यासक्रमाचे विश्लेषण :- कोणत्याही कामाचे नियोजन न करणे म्हणजे अपयशी होण्याचे नियोजन करण्यासारखेच आहे. त्यामुळे परिपूर्ण नियोजन करणे हा आपल्या यशस्वीतेचा पाया ठरू शकतो. नियोजनात अगदी परीक्षेची तारीख किती ? अभ्यासक्रम किती कालावधीत पूर्ण करावा ? सर्वांसाठी किती वेळ द्यावा ? कोणती दर्जेदार पुस्तके वापरावीत ? पूरक साहित्य कोणते वापरावे? सराव चाचण्या किती घ्याव्या? न समजलेले प्रश्न, अडचणी कशा दूर कराव्या ? याचे संपूर्ण नियोजन करणे अपेक्षित असते.

परीक्षेचा अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका पॅटर्न व्यवस्थित समजून घ्या.कोणत्या विषयांना जास्त महत्त्व आहे, कोणत्या घटकांवर अधिक प्रश्न विचारले जातात, याचा अभ्यास करा.

वेळेचे योग्य नियोजन :- एक योग्य अभ्यास-वेळापत्रक तयार करा आणि त्यानुसार अभ्यासाला सुरुवात करा.वेळेचं नियोजन करून, प्रत्येक विषयासाठी पुरेसा वेळ द्या.

विषय-विशिष्ट तयारी :- प्रत्येक विषयाचा व्यवस्थित अभ्यास करा. गणित,बुद्धिमत्ता,इंग्रजी व मराठी या विषयांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. NCERT पुस्तके आणि इतर संदर्भ पुस्तकांचा वापर करा.महत्त्वाचे मुद्दे, सूत्रे आणि संकल्पना अधोरेखित करा.

सराव :- नियमितपणे सराव प्रश्नपत्रिका आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा.यामुळे तुम्हाला परीक्षेच्या फॉरमॅटची कल्पना येईल आणि वेळेचे व्यवस्थापन सुधारण्यास मदत होईल. आपण फक्त अभ्यास करत पुढे गेलो मूल्यमापनच केले नाही तर अडचणी निर्माण होतात. आपण अभ्यासलेला किती भाग कोणता भाग आपल्याला समजला आहे किंवा लक्षात राहिलेला आहे? कोणत्या भागात जास्त सरावाची गरज आहे ? हे समजण्यासाठी नियमितपणे मूल्यमापन करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी छोट्या स्वरूपाच्या चाचण्या घेणे गरजेचे ठरते. यातूनच आपले कच्चे दुवे चांगल्या बाबी आपणास समजतात.

सराव पेपर :- परीक्षेच्या काळात नियमितपणे सराव पेपर द्या.यामुळे तुम्हाला तुमच्या तयारीची कल्पना येईल आणि कोणत्या विषयात अधिक तयारी करायची आहे, हे समजेल. मूल्यमापन केल्यानंतर सर्व प्रश्नांचा आढावा घेताना कोणते प्रश्न बरोबर आलेत कोणते प्रश्न चुकले याबाबत माहिती मिळते. त्यानंतर चुकलेले प्रश्नांची उकल काढण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असते.अशा प्रकारचे प्रश्न पुन्हा चुकणार नाहीत यासाठी अडचणी वेळेस दूर करणे आवश्यक असते. आपल्या समस्या सोडवून पुढील परीक्षेसाठी सज्ज राहावे लागते. आणि यातून आपला आत्मविश्वास वाढतो म्हणून आलेल्या समस्या सोडवणे अत्यंत आवश्यक असते.

आत्मविश्वास :- अभ्यासासोबतच, सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.

पुरेशी विश्रांती :- अभ्यासासोबतच, पुरेशी झोप आणि विश्रांती घेणे देखील आवश्यक आहे.यामुळे तुम्ही परीक्षेसाठी अधिक उत्साही आणि लक्ष केंद्रित करू शकता.

निरोगी आहार :- निरोगी आणि संतुलित आहार घ्या.यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यास मदत होईल.

शिक्षकांची मदत :- गरज वाटल्यास, शिक्षकांची किंवा मार्गदर्शकांची मदत घ्या.ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतात.

नियमितपणे अभ्यास :- शिकवलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी नियमितपणे करत राहणे आवश्यक असते.आठवड्याला झालेल्या भागाची उजळणी करणे आवश्यक असते, तरच तो भाग समृद्ध होतो अशा पद्धतीने नियमित सराव केल्यानंतर आपली तयारी उत्तम होऊ शकते. त्यामुळे

नियमितपणे अभ्यास करणे महत्वाचे आहे.एकाच वेळी जास्त अभ्यास करण्याऐवजी, थोडा थोडा अभ्यास नियमितपणे करत राहा.

अपडेट रहा :- चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानावर लक्ष ठेवा.यासाठी, वर्तमानपत्रे, मासिके आणि इतर शैक्षणिक संसाधनांचा वापर करा.

या वरील टिप्सचा अवलंब करून, तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळवू शकता.

युवा पत्रकार संघ व कर्मवीर परिवार परंडा यांच्या वतीने महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुजित बाळासाहेब देशमुख यांच्या राज कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांची वर्ष-2014 पासून ते आतापर्यंत एकूण 28 विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत निवड , वर्ष-2017 पासून ते आतापर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण 39 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक तसेच वर्ष-2020 पासून ते आतापर्यंत एकूण 12 विद्यार्थ्यांची सातारा /चंद्रपूर सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत निवड झालेली आहे.

सुजित बाळासाहेब देशमुख

(B.Sc. B.Ed)

तज्ञ मार्गदर्शक,माजी विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय,तुळजापूर (C.B.S.E)

मूळगाव:- खासापुरी नं-2 ता.परंडा, जि-धाराशिव

राज कोचिंग क्लासेस,परंडा/बार्शी

8698021079 / 8805038831


 
Top