धाराशिव (प्रतिनिधी)-  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शुक्रवारी रस्त्याच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांना निमंत्रित करणार असल्याच म्हटले. आम्ही तर म्हणतोय की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नव्हे तर देशाच्या पंतप्रधान यांच्या हस्ते उदघाटन करा, पण शहरवासियांना एकदाच खड्यापासून मुक्त करा, प्रशासकीय अडथळा कधीच नव्हता तो फक्त आर्थिक अडथळा होता. असा आरोप सोमनाथ गुरव यांनी आमदार राणा पाटील यांच्यावर केला. 

अचानक पत्रकार परिषद घेऊन नवीनच निधी आल्यासारखे दाखवून कोणाची फसगत करायची होती. असा सवाल सोमनाथ गुरव यांनी विचारला. प्रशासकीय अडथळा दूर झाल्याचे काल आमदार म्हणाले. यामध्ये प्रशासकीय नव्हे तर आर्थिक हितसंबंधाचा मोठा अडथळा आणला आहे. त्यात पुन्हा पालकमंत्री व आमदार यांच्यात वर्चस्ववादाची लढाई सुरु झाली. जे तुमच्या स्वभावाप्रमाणे दोन्ही पालकमंत्री यांच्याबरोबर झालं. आता मात्र तुम्हीच विषय काढला व उदघाटन वगैरे बोलायला सुरु केल म्हणल्यावर आता तरी काम सुरु होण्यास अडचण येणार नाही असा चिमटा गुरव यांनी काढला. त्यामुळे आमचं म्हणणं इतकंच आहे कोणाच्याही हस्ते उदघाटन करा पण खड्यापासून शहरवासियांना मुक्तता द्या असे आवाहन गुरव यांनी आमदार पाटील यांना केले आहे. 


विलंब का झाला चौकशी करा

या सगळ्या प्रक्रियेला विलंब का झाला याची चौकशी व्हावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी वारंवार अधिवेशनात केली. तसेच आम्हीही मुख्याधिकारी यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. पण त्याची चौकशी का होत नाही? असा सवाल गुरव यांनी करून अजूनही चौकशी करावी म्हणजे यांचे खरे रूप जनतेसमोर येईल असा दावा त्यांनी केला.

 
Top