मुरुम (प्रतिनीधी)- शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून शेतरस्त्यासह शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्न सोडवत विकसीत महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावला आहे. बसवराज पाटील यांनी संपूर्ण जीवन जनतेसाठी समर्पीत केले आहे. त्यामुळे रात्री अकरा वाजले तरी सभेत टाचणी पडली तरी आवाज येईल अशी सुंदर सभा आहे. मनुष्य किती जगला यापेक्षा कसा जगला हे महत्त्वाचे आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ अशा अनेक संकटांचा सामना केला. संकटांचा थोडा काळ आसतो आपल्या प्रामाणिकपणामुळे यातुन सही सलामत बाहेर पडलात. 237 आमदार घेऊन महायुतीचे सरकार आले हा बसवराज पाटील यांचा पायगुण आहे. राज्यातील सर्व शेतरस्ते 12 फुटांचे होणार आहेत. येत्या पाच वर्षांत राज्यातील संपूर्ण शेतरस्ते डांबरीकरण करण्याची हमी महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना व शरण पाटील फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने कारखाना परिसरात गुरुवारी (दि.7) ऊस शेतीसाठी ए. आय. तंत्रज्ञानाची कार्यशाळा व शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना महसुमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बसवराज पाटील, माजी मंत्री आ. राणाजगजितसिंह पाटील, संजय कोडगे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, युवा नेते शरण पाटील, सुनिल चव्हाण, किरण पाटील, मिलिंद पाटील, नितीन काळे, व्यंकटराव गुंड, कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गवसाने, बसवराज कस्तुरे, बलभिम पाटील आदी मान्यवर उपस्थितीत होते.

पुढे बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले की, विकसित भारताचा संकल्प ए. आय. तंत्रज्ञानाच्या जोरावर केला आहे. इथेनॉल व ऊस गाळपासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान वापरायचे आहे.  यावेळी बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, जिल्हा बँकेला मदत करुन गतवैभव मिळवून देण्याची मागणी यावेळी पाटील यांनी केली. यावेळी शरण फाऊंडेशनचे अध्यक्ष शरण पाटील यांनी प्रास्ताविक केले. 


 
Top