धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील हिंदी विभागातील संशोधन केंद्रामधील विद्यार्थीनी तृप्ती सुरेश सोनवणे यांना हिंदी विषयातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर या विद्यापीठाने पीएच.डी पदवी प्रदान केली आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय '21 वी सदी की प्रथम दशक की हिंदी कहानी मे स्त्री विमर्श' हा होता. त्यांचे संशोधक मार्गदर्शक कळंब येथील डॉ.दत्ता साकोळे हे होते.
त्यांनी स्त्रियांच्या समस्या आणि विविध क्षेत्रातील स्त्रियांचे योगदान यावर अनेक वर्तमानपत्रातून आणि शोधनिबंधातून लेखन केलेले आहे. सदर संशोधनासाठी त्यांचे वडील कै. सुरेश सोनवणे, आई अरुणा सुरेश सोनवणे आणि बंधू सार्थक सोनवणे यांच्याकडून प्रेरणा मिळाली.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. सदर संशोधनासाठी त्यांना रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ.केशव क्षीरसागर, प्रा.विवेकानंद चव्हाण, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद गायकवाड, व्यंकटेश महाजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत चौधरी ,प्रा.डॉ. अशोक मर्डे, डॉ. विनोद वायचळ त्याचबरोबर त्यांचे नातेवाईक यांचे त्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या सहकार्य मिळाले. पीएच.डी पदवी प्राप्त केल्या बद्दल रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांचे विविध स्तरातून या यशाबद्दल कौतुक केले जात आहे.