उमरगा (प्रतिनिधी)- महाराष्ट्र रोल बॉल असोसिएशन अंतर्गत रोलबाल असोसिएशन ऑफ उस्मानाबाद ओम साई स्पोर्ट्स क्लब उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 15 वी मिनी धाराशिव जिल्हास्तरीय रोल बॉल स्पर्धा व राज्यस्तरीय निवड चाचणी झाली असून, त्यामध्ये 12 खेळाडूंची निवड करण्यात आला आहे.
यावेळी सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, पञकार लक्ष्मण पवार, अमोल बडवे, शांतीदूत परिवाराचे अध्यक्षा विद्याताई जाधव, क्रीडा शिक्षक काळे गुरूजी, योगेश सौदागर, गोविंद जाधव, ॲड.पाटील यांची उपस्थिती होती. स्पर्धेत धाराशिव रोलबॉल संघटनेचे सचिव प्रताप राठोड, मार्गदर्शक अमोल बडवे, पालक अनमोल शेख, कल्पना शिवदे पाटील, पूजा शीर्षीकर, कांचन बडवे, मैथिली पाटील, कविता राठोड, मलदोडे पवार, गायकवाड सर्व पालक, ओम साई स्पोर्ट्स क्लब उमरगा यांची उपस्थिती होती. प्रशिक्षक प्रतापसिंह राठोड, ओम राठोड, रोहित पायमल, श्याम दूधभाते, साई राठोड, सत्य गणेश गाली पिल्ले यांनी अथक परिश्रम घेतले.
यांची झाली निवड
या स्पर्धेत बारा मुली व बारा मुलांचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. ह्या निवडीमध्ये मुलीच्या संघात (अंडर- 11) मध्ये ओवी बडवे, आयात शेख, आरोही माणिकवार, आरजू फकीर, मानसी गायकवाड, स्वराली माने, तर मुलांमध्ये कार्तिक लवटे, शिवम लवटे, श्रीराज बिराजदार, शिवांश बेडदुर्गे, रिधान मुलाजकर, अद्विक काळे, रुद्राक्ष बडवे, सुयश सूर्यवंशी, आदित्य कोळी, निनाद शिरशीकर, इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या निवड चाचणीवेळी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.