कळंब (प्रतिनिधी)- अमरसिंह कमलाकर पाटील या लहान भावाच्या स्मरणार्थ मोठ्या भावाने गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा या शाळेला शाळेच्या सुशोभीकरणासाठी 5 हजार रुपयाची देणगी दिली.
पुणे येथे हायटेक सर्विसेस या कंपनीत प्रोडक्शन विभागात कार्यरत असलेला मोठा भाऊ प्रमोद कमलाकर पाटील याने आपला लहान भाऊ अमरसिंह कमलाकर पाटील याची आठवण म्हणून त्याच्या स्मरणार्थ शाळेतील स्टेजच्या सुशोभीकरणासाठी 25 हजार रुपयाची देणगी देऊन सहकार्य केले आहे. या देणगीमुळे आपल्या भावाचे स्मरण सतत आमच्या कुटुंबाला व गावातील प्रत्येक नागरिकाला राहावे या उदात्त उद्देशाने ही देणगी दिली आहे.
या देणगी बद्दल शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशील गायकवाड, उपाध्यक्ष तैमुरलंग शेख व शाळेतील शिक्षक श्रीकांत तांबारे, अमोल बाभळे, सचिन तामाने,शहाजी बनसोडे, राजाभाऊ शिंदे, लिंबराज सुरवसे, प्रमोदिनी होळे, रंजना थोरात तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पाटील कुटुंबाचे आभार मानले.