तुळजापूर (प्रतिनिधी)-   तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ शिवारात वाघाने गाईवर हल्ला करून ती ठार केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली.

गंधुरे यांची सिंदफळ शिवारातील ढेकरी गावाजवळ शेती असून त्यांच्या गाईवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात गाय ठार झाली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने पंचनामा केला आहे. सदर वाघ येडशी जंगलातून आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रात्री तो पाळीव प्राण्यांवर हल्ला करतो, तर दिवसा ऊसाच्या शेतात, डोंगराच्या खापरीत आणि जंगलात आसरा घेतो. हा वाघ तब्बल 25 ते 30 किलोमीटरपर्यंत स्थलांतर करतो, असे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे सिंदफळ परिसरासह तालुक्यातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

 
Top