तुळजापूर (प्रतिनिधी)-  लातूर रोडवरील रुद्र सिटीला जाणारा रस्ता पावसाच्या पाण्याने पूर्ण बुडाला आहे. अर्धवट रस्ते, नालीकामा आणि चुकीचा पाणी निचऱ्याचा आराखडा यामुळे पाणी थेट रस्त्यावर थांबून राहिले आहे. परिणामी, नागरिकांना  गुडग्याभर पाण्यातून रोजची ये-जा करावी लागत आहे.वाहने न्यावे लागत आहे.

सर्वात धक्कादायक म्हणजे, 158 कोटींच्या सिमेंट रस्ता व नाल्यांच्या कामात बाह्यभागातील वस्तीविरहित ठिकाणी प्राधान्य दिल्याचा आरोप होत आहे. तर प्रत्यक्षात पावसात बुडणारे महत्वाचे रस्ते दुर्लक्षित आहेत. नळदुर्ग रोडवरुन पाणी येवुन ते लातुर रस्ता पर्यत पोहचत असुन ते रुद्र सिटीजवळ थांबुन,  रस्ता जलमय झाला आहे. “विकास कामे झालीत, पण आमच्या मुळावर उठलीत! पाणी थांबत असल्याने रोगराईचा धोका वाढला आहे, आणि आम्ही दररोज जीव मुठीत घेऊन जातो आहे. आमचे घरातील मंडळी आजारी पडत आहेत. पावसात रस्ते पोहत असताना, विकास कुठे वाहून गेला? असा प्रश्न विचारला जात आहे.

 
Top