भूम (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना दिलेली स्थगिती आम्ही उठवत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथे माजी आमदार राहुल मोटे यांच्या पक्ष प्रवेशच्या वेळी बोलताना सांगितले. भूम-परंडा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी शरद पवार गटाला राम राम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला .मुंबई या ठिकाणी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या वेळी अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या कामावरील स्थगती उठवत असल्याचे जाहीर केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री प्रताप सरनाईक, यांच्यासोबत मंगळवारी बैठक घेत या बैठकीमध्ये डीपीडीसीतील स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. मागील काही काळापासून धाराशिव जिल्ह्यातील नियोजन समितीच्या सर्व कामांना स्थगिती दिल्यामुळे युतीतील पक्षात एकमेकांवर आरोप सुरू होते. यातच 25 मार्च रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देण्यासाठीचे पत्र जिल्हा अधिकारी कीर्ती किरण पुजारी यांना दिले होते. मागील चार महिन्यांत धाराशिव जिल्ह्यातील 268 कोटींची च्या डीपीडीसीच्या निधीमधील बंद झाली होती. स्थानिक स्वराज्य निवडणुकीला जनतेपुढे जावे लागणार असल्याने युतीतील नेत्यांना अडचण निर्माण झाली होती. स्थगिती उठल्यामुळे युतीसह विरोधातील पक्षांनाही त्याचा फायदा होणार आहे.


यांनी घेतला अजित पवार गटात प्रवेश 

माजी आमदार राहुल मोटे, ॲड रंणजीत मोटे, आर डी सुळ, संजय पाटील, शिवाजी गाढवे, तात्यासाहेब गोरे, मच्छिंद्र कवडे, सुदाम पाटील, हनुमंतराव पाटोळे, प्रशांत कवडे, राहुल बनसोडे, दत्तात्रय पाटील, प्रताप देशमुख, आदिनाथ पालके, नानासाहेब पाटील, संजय बोराडे, प्रवीण खटाळ, भाऊसाहेब खरसाडे, धनंजय हांडे, सोमनाथ शिरसाठ, हरिश्चंद्र मिस्कीन, विजय बोराडे, धनंजय मोरे, शहाजी दराडे, सतीश सोन्ने, गौरीशंकर साठे, अश्रोबा चोरमले यांनी प्रवेश घेतला.

 
Top