परंडा प्रतिनिधी - जि.प.चे माजी उपाध्यक्ष जेष्ठ विधिज्ञ ॲड.दादासाहेब खरसडे यांच्या वकीली सेवा कार्यकालास 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल परंडा विधिज्ञ मंडळाच्या वतीने जिल्हा व अतिरिक्त सत्र परंडा न्यायाधीश डॉ.एफ.ए.एम.ख्वाजा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

येथील न्यायालयाच्या सभागृहात मंगळवार दि.5 रोजी ॲड.खरसडे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी

जिल्हा व अतिरिक्त स्त्रत्र परंडा न्यायाधीश डॉ.एफ.ए.एम.ख्वाजा होते तर वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश ए.ए.शेख , सह दिवाणी न्यायाधीश आर.टी. इंगले, कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश डी.जी. जगताप व सहदिवाणी न्यायाधीश ए.एन.निवडंगे व विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.सतीश माने यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांचा सत्कार परंडा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष  माने, कार्याध्यक्ष ॲड. अमोल पाटील, उपाध्यक्ष ॲड. विरेंद्र पाटील, सचिव ॲड. उमेश चंदनशिवे ,ॲड.श्रीमती शेख, ॲड.भुजंगराव जामदारे यांनी केला.न्यायाधीश ख्वाजा यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

खरसडे यांनी तांदूळवाडी गावखेड्यातून प्राथमिक शिक्षण घेतले.करमाळा येथे माध्यमिक व महाविद्यालयीन तर पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज येथे बीएस्सी,एलएलबी शिक्षण घेतले.1975 साली वकीली सुरु केली होती.तसेच त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करीत असताना धाराशिव जिल्हा परिषद उपाध्यक्ष ,जिल्हा नियोजन मंडळ सदस्य ,समन्वय दक्षता समिती अध्यक्ष व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश सदस्य आदि पदे त्यांनी भूषवली आहेत.सर न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते त्यांचा जेष्ठ विधिज्ञ म्हणून सन्मान देखील छत्रपती संभाजीनगर येथे झालेला आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड.विवेक काळे तर प्रस्ताविक ॲड. संतोष सुर्यवंशी यांनी केले तर मनोगत ॲड.नुरुद्दिन चौधरी यांनी व्यक्त केले व आभार प्रदर्शन ॲड.सतीश माने यांनी केले. यावेळी मोठया संख्येने विधिज्ञ उपस्थित होते.

 
Top