तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज बुधवार, 6 ऑगस्ट 2025 रोजी नवीन उडीद व मुग या शेतीमालांची पहिली आवक झाली. 

निंलगाव येथील शेतकरी संजय राठोड आणि धनंजय मुंगे यांनी प्रथमच उडीद व मुग बाजारात विक्रीस आणल्या बद्दल त्यांचा श्रीफळ गुछ देवुन बाजार समिती तर्फ सत्कार करण्यात  आला   सध्या उडीद ,दर 7000 ते 7800 आणि मुगाचा दर 6500-7000 पर्यंत मिळाला. ही विक्री बाजार समितीच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी संचालक संतोष कदम, श्री. बालाजी रोचकरी , श्री. दत्ता वाघमारे, आडत व्यापारी रेवणसिध्द बचाटे संभाजी मुळे अकुंश नन्नवरे प्रशांतशेळके प्रशांत पाटील सतिश मुदडा शिरीष गवसाने अक्षय मेहता गणेश लोमटेसह आडत व्यापारी, शेतकरी आणि हमाल बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सचिवांचे आवाहन

शेतकऱ्यांनी आपला माल वाळवुन स्वछकेलेला माल  बाजार समितीत विक्रीस आणावा व दलालांपासून दूर राहावे, असे आवाहन सचिव उमेश भोपळेयांनी केले.

 
Top