ढोकी (प्रतिनिधी)- ढोकी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या लोखंडी खिडकीचे ग्रिल कटरच्या साह्याने कट करुन आत प्रवेश करत तिजोरीतील निराधार महिलांच्या पगारी , लाडकी बहीण यांचा हप्ता , व घरकुल हप्ता यांचे लाखो रुपये लंपास केल्याची घटना रविवार दि.4 ऑगस्ट रोजीच्या मध्यराञी घडली असुन घटनास्थळी श्वन पथकास पाचारण करून माघ घेण्यात आला या चोरीमुळे मोठी खळबळ उडाली मागील काही वर्षापुर्वी हिच बॅक फोडुन लाखो रुपये हडपले होते. 

याबाबत पोलिसाकडुन मिळालेल्या माहितीनुसार, ढोकी गावाच्या मुख्यवेशी समोर जिल्हा मध्यवर्ती बॅक आसुन या बॅकेत शुकवार दि.1 ऑगस्ट रोजी जिल्हा बॅकेच्या मुख्य शाखेतुन तिन लाख रुपये आणले होते. या पैशातून निराधार पगार,लाडक्या बहिणीचा हप्ता व घरकुल हप्ता यासाठी रक्कम आणली होती. हि रक्कम बॅकेच्या तिजोरीत ठेवली होती रविवार दि.4 ऑगस्ट रोजी  मध्यराञी अज्ञात चोरट्यानी बॅकेच्या पुर्व बाजुकडील खालुन भितं पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु ती पडली नसल्यामुळे परत बॅकेच्या दक्षिण बाजुच्या दरवाज्या जवळील भिंत पाडण्याचा प्रयत्न केला. न पडल्यामुळे त्याच बाजुला लोखंडी खिडकीचे लोखंडी ग्रिल कटरच्या साह्याने कट करुन आत प्रवेश केला बॅकेतील गॅस कटरच्या साह्याने तिजोरी कट करुन तिजोरीतील तब्बल 3 लाख 31 हजार पाचशे रुपये लंपास केले व घटनास्थळीच एक मोठा गॅस सिलिंडर फेकून फरार झाले. सोमवार दि.4 ऑगस्ट सकाळी दहा वाजता बॅक उघडल्यानंतर नंतर बॅकेचे मॅनेजर प्रताप माने यांना हि घटना उघडकीस आली. त्यानंतर माने यांनी जिल्हा बॅकेच्या कार्यकारी संचालक यांना माहिती देऊन पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर बॅकेचे कार्यकारी संचालक सुधिर म्हेञे,प्रशासन आधिकारी संजय गायकवाड,प्रशासकीय आधिकारी विनोद लावंड,ढोकी पोलिस स्टेशन सपोनि विलास हजारे,पोलिस उपनिरीक्षक तांबडे, किशोर माळी ,सहाय्यक फौजदार राजाभाऊ सातपुते, पी कॉ दत्ता थाटकर हे घटनास्थळी पोहचले व घटनेची पाहणी करून धाराशिव येथील आधिकारी व श्वान पथक पाचारण करून बॅकेच्या परिसरात माघ घेण्यात आला. याप्रकरणी प्रताप माने यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर माळी हे करित आहेत.


 
Top