भूम (प्रतिनिधी)-  येथील महसूल विभागात कार्यरत असलेले देवळाली सज्जाचे तलाठी प्रताप शिवराज बोराडे यांना मंडळ अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली असून त्यांचा महसूल दिनाचे औचित्य साधून त्यांना जिल्हाधिकारी डॉ. किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते पदोन्नतीचे आदेश प्रदान करण्यात आले. तालुक्यातील सावरगांव (द ) येथील प्रताप बोराडे हे अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावत असून त्यांच्या कार्याची दखल घेत ही बढती देण्यात आली आहे. 

जनतेच्या दैनंदिन जीवनात महसूल विभागाचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता, महसुल दिनाचे औचित्य साधून महसूल विभागाच्या विविध महत्वाकांक्षी व लोकाभिमुख उपक्रमामध्ये सन 2024-25 या वर्षात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल तसेच जनतेला तत्परतेने सेवा देऊन महसूल विभागाची प्रतिमा उंचावल्याबद्दल प्रताप शिवराज बोराडे यांची मंडळ अधिकारी संवर्गात पदोन्नती तहसिल कार्यालय परंडा येथे करण्यात आली आहे. यावेळी प्रताप बोराडे यांना डॉ. किर्ती किरण पुजार यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, अप्पर जिल्हाअधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हा अधिकारी शोभा जाधव ,जिल्हाधिकारी यांच्या सुविद्य पत्नी सौम्यश्री किर्ती किरण पुजार, तहसीलदार जयवंत पाटील यांची उपस्थिती होती. या पदोन्नतीमुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


 
Top