धाराशिव (प्रतिनिधी)- समरसता साहित्य परिषद यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिजन्म शताब्दी निमित्त राज्यस्तरीय खुल्या लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे जिल्हास्तरीय बक्षिस वितरण अभिनव इंग्लिश स्कूल येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री सतीश गोपालचंद मोदानी सचिव राजस्थानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सोमनाथ मोतीराम लांडगे संचालक श्री साई श्रद्धा एज्युकेशन धाराशिव हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अॅड. सचिन सूर्यवंशी यांनी करताना समरसता साहित्य परिषद यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी राज्यस्तरीय खुली लेखन स्पर्धा आयोजित करण्यामागची भूमिका विषद केली. विद्यार्थ्यांमध्ये समरसता हा भाव यावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमांमध्ये लेखन स्पर्धेतील विजेते यांना शाल, श्रीफळ, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम श्री धनंजय झोंबाडे, द्वितीय श्रीमती उमा सौदागर, तृतीय श्रीमती उज्वला मसलेकर व उत्तेजनार्थ श्री मारुती बनसोडे यांना सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये अनुराधा उपासे, अश्विनी लोखंडे, अॅड. जयश्री तेरकर, मकरंद पाटील, प्रज्ञा महाजन, नेहा कांबळे, तेजस वैष्णव व सोनाली कांबळे यांचा समावेश आहे. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून मार्गदर्शन करत असताना प्रा. सोमनाथ लांडगे यांनी अहिल्यादेवी यांच्या जीवन चरित्रावर ती प्रकाश टाकत असताना अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य अतिशय भव्यदिव्य व क्षेत्र जात, पात या बंधनाच्या बाहेर जाऊन संपूर्ण मानव जातीच्या, प्राण्यांच्या कल्याणासाठी व धर्मासाठी समर्पित होते. त्यांच्या जीवनचरित्रातून मानवाला नेहमीच प्रेरणा घेण्यासारखी आहे. अनेक कठीण काळात सुद्धा कसे उभे राहावे हे शिकण्यासारखे आहे, असे प्रतिपादन केले. अध्यक्ष म्हणून संबोधित करत असताना श्री सतीश मोदानी यांनी अहिल्यादेवीच्या चरित्रामुळे पुन्हा नव्याने काम करण्याची व समाजासाठी काही चांगले करण्याची प्रेरणा मिळते असे सांगितले. या भव्य कार्यक्रमासाठी अॅड. रवींद्र कदम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा संघ चालक, श्री शाम बलुतकर सामाजिक समरसता मंच विभाग संयोजक, राजेंद्र कापसे, मनीषा बलुतकर, उषाताई लांडगे, अश्विनी सूर्यवंशी, प्रशांत महाजन, मंगेश तिवारी, अॅड. कृष्णा भोसले, अॅड. नामदेव तेरकर, अहिल्यादेवी होळकर यांच्या आजीचे वंशज श्री अमोल जगन्नाथ मैंदाड, श्री गोरठेकर सर, शाळेतील शिक्षक कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन अश्विनी कुलकर्णी यांनी तर आभार अॅड. शांतीबळ कांबळे यांनी मानले.

 
Top