धाराशिव (प्रतिनिधी)-  तालुक्यातील भानसगाव शिवारात वाघाने पुन्हा रक्तरंजित हल्ला केला. आहे सोमवार दि.11 ऑगस्ट रोजी रात्री चरण्यासाठी सोडलेल्या बैलावर हल्ला चढवून त्याचा फडशा पाडला. तर जवळच चरणाऱ्या म्हशीवरही तुटून पडून तिचे लचके तोडले. या घटनेमुळे भानसगावसह येडशी व सोनेगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, बैल व म्हैस शिवारातील बांधाजवळ चरण्यासाठी सोडले होते. अचानक वाघाने झडप घालत बैलाला ओढून नेले. त्यानंतर दुसऱ्या एका शेतकऱ्याच्या म्हशीवरही वाघाने हल्ला केला.येडशी भागातही काही शेतकऱ्यांना वाघ आढळल्याची चर्चा आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी येडशी जंगल परिसरात वाघ आणि बिबट्याच्या हालचालींनी दहशत निर्माण केली होती. त्या काळात अनेक जनावरांचा बळी गेला होता. परिस्थिती गंभीर होताच वनविभागाने रेस्क्यू टीमला पाचारण केले होते. त्यानंतर काही काळ वाघ किंवा बिबट्याची चर्चा थांबली होती. मात्र आता पुन्हा एकदा या भागात वाघ तसेच बिबट्या सक्रिय असल्याची चर्चा होत असून, जनावरांवर हल्ले सुरू झाल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.

 
Top