धाराशिव (प्रतिनिधी)- जिजामाता कन्या माध्यमिक विद्यालय,तुळजापूर येथे नुकताच जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात विद्यार्थिनींना बालहक्क व मुलांशी संबंधित समस्या याविषयी माहिती देण्यात आली.त्यात बालविवाह, बालकामगार,बालतस्करी, बालभिक्षा,बाललैंगिक अत्याचार, बालशोषण, शिशुगृह व बालगृह या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.तसेच चाइल्ड हेल्प लाईन 1098 व विविध बालसंबंधी योजनांची माहिती देण्यात आली.

प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ए.बी. कोवे व चाइल्ड हेल्प लाईन 1098 चे प्रकल्प समन्वयक व्ही.पी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात विद्यार्थिनींना बालहक्क व मुलांशी संबंधित समस्या याविषयी माहिती देण्यात आली. त्यात बालविवाह, बालकामगार, बालतस्करी, बालभिक्षा, बाललैंगिक अत्याचार, बालशोषण, शिशुगृह व बालगृह या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

चाइल्ड हेल्प लाईन 1098 व विविध बालसंबंधी योजनांची माहिती चाइल्ड हेल्प लाईनच्या सुपरवायझर पल्लवी पाटील यांनी विद्यार्थिनींना दिली. तसेच अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांबाबतही माहिती समजावून सांगण्यात आली. कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापिकामेटकरी मॅडम, शिक्षकवृंद कुंभार,श्री. साळुंखे,श्री.तुपे,श्री.दासकर,श्री. कोकरे,श्रीमती दराडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या जनजागृती उपक्रमात एकूण 240 विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


 
Top