धाराशिव (प्रतिनिधी)- 15 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य विभाग धाराशिव अंतर्गत प्रा.आ. केंद्र पारगाव (ता.वाशी),प्रा.आ.केंद्र अंभी (ता.भूम) व प्रा.आ.केंद्र मंगरूळ क.(ता. कळंब) या आरोग्य संस्थांनी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत सन 2025 मध्ये राष्ट्रीय मूल्यांकन प्राप्त केल्याबद्दल संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉ.भक्ती देशपांडे (प्रा.आ.केंद्र पारगाव),डॉ. बाराते (प्रा.आ.केंद्र अंभी), डॉ.तिरुपती मुलगीर (प्रा.आ. केंद्र मंगरूळ क.) यांचा सन्मान करण्यात आला.कायाकल्प कार्यक्रमांतर्गत राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल श्री.रमाकांत जोशी (प्रकल्प प्रमुख,स्पर्श उपजिल्हा रुग्णालय,सास्तूर) यांचा देखील सत्कार करण्यात आला.
याचबरोबर मुख्यमंत्री 100 दिवस कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर विभागातून प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळाल्याबद्दल डॉ.जे.एन.सय्यद (तालुका आरोग्य अधिकारी, कळंब) यांना पालकमंत्री प्रताप सरनाईक व जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.कार्यक्रमादरम्यान श्री.शरद मुंडे,अध्यक्ष जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना,धाराशिव यांनी संघटनेतर्फे जिल्ह्यातील 11 क्षयरुग्णांना 6 महिन्यांसाठी निक्षय मित्र पोषण आहार किट वाटप केले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजित बनसोडे यांनी जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती व सेवाभावी संघटनांना निक्षय मित्र बनून क्षयरुग्णांना पोषण आहार पुरवण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. के.के.मिटकरी,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी फुलारी, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.एम.आर.कोरे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.