भुम (प्रतिनिधी)- श्रमिक मानवाधिकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार याना निवेदन देण्यात आले.यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग भाऊ ताटे ,माया शिंदे, रामभाऊ लगाडे आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी माननीय कीर्ती कुमार पुजार व निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमण नावे करून घरकुल देण्यात यावी गायरान जमिनीवर वहीती असलेल्या जमिनीवरील पिकांचे पंचनामे करून गाव नमुना नंबर एक ई नोंद घ्या इत्यादी मागण्याचे निवेदन देण्यात आले.