धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथे दिनांक 16 8 2025 रोजी मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या धाराशिव शाखेची बैठक धाराशिव येथे संपन्न झाली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरुणभाऊ बनसोडे हे होते. यावेळी सामाजिक व कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांच्यावरती, प्रश्नावरती  चर्चा करण्यात आली यावेळी विजय गायकवाड यांनी संघटनेची भूमिका विशद करून शासनाने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी. कर्मचाऱ्यांचे थकीत बिले त्वरित देण्यात यावेत अशा व इतर मागण्यांचे निवेदन शासनाकडे पाठवणार असल्याचे सांगितले. या बैठकीस राजाभाऊ बनसोडे, नितीन सोनवणे, यु व्ही माने , पांडुरंग सवाई, सुनील बनसोडे, प्रभाकर बनसोडे, अशोक बनसोडे, प्रदीप शिंदे, बाळासाहेब माने, राजेंद्र धावारे, इत्यादींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रभाकर बनसोडे यांनी केले कार्यक्रमाचे आभार सुनील बनसोडे यांनी मानले.

 
Top