तेर (प्रतिनिधी ) धाराशिव तालुक्यातील तेर येथील कामगार नेते अभिमान रसाळ यांनी विविध मागण्यासाठी तेर ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसले होते.तेर ग्रामपंचाक्यतने लेखी आश्वासन दिल्याने अभिमान रसाळ यांनी उपोषण सोडले.

तेर येथील कामगार नेते अभिमान रसाळ यांनी विविध मागण्यांचे निवेदन तेर ग्रामपंचायतला दिले होते.जर विविध मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तेर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर १५ आॅगष्टला उपोषणास बसणार आहे असे निवेदन दिले होते.ग्रामपंचातने मागण्या मान्य केल्या नसत्याने १५ आॅगष्टला कामगार नेते अभिमान रसाळ यांनी तेर ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसले होते.कांही वेळानंतर सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी अभिमान रसाळ यांच्या मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन दिल्याने अभिमान रसाळ यांनी उपोषण सोडले.


 
Top