धाराशिव (प्रतिनिधी)- प्राथमिक आरोग्य केंद्र केशेगाव ता. धाराशिव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिष हरिदास यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 15/08/2025 व 19/08/2025 या आठवडयात दोन वेळस पुरुष नसबंदी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. दोन्ही कॅम्पला कार्यक्षेत्रातील लाभार्थी यांनी पुरुष नसबंदी शास्त्रक्रिया करून घेण्यासाठी प्रतिसाद देऊन, पुरुष नसबंदी शास्त्रक्रिया करून घेतली. या कॅम्पसाठी सर्जन म्हणून जिल्हा रुग्ण्यालय धाराशिव येथील सर्जन डॉ. नानासाहेब गोसावी यांनी लाभार्थीवर शास्त्रक्रिया केली. यावेळी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. मारुती कोरे उपस्थित होते. या कॅम्पचे आयोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद गिरी यांनी केले होते.

या कॅम्पसाठी वैधकीय अधिकारी डॉ. गंगा मुधोळकर, डॉ. सत्यजित निपाणीकर, जिल्हास्तरीय पर्यवेक्षेक तानाजी क्षिरसागर, तालुकास्तरीय सुपरवाझयर दिपक व्हटकर, सचिन तटाळे, विकास अकोसकर, तसेच प्राथामिक आरोग्य केंद्र येथील निताराणी गायकवाड, सायुज्जता दरफळकर, हाफिजा शेख,अश्विनी काळे, सुनीता लकडे, मनीषा भालशंकर, अंजली चराटे, सुनील मिसाळ, गणेश कांबळे, कमलाकर हुंबे,विवेक कदम, योगेश नागरसे  उपस्थित होते.

 
Top