भूम (प्रतिनिधी)- आयुष्यात चार दिवस अधिक जगायचं असेल तर आनंदी राहावं लागेल, येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करावी लागेल, अडथळे येणारच आहेत, पर्याय शोधल्या शिवाय गत्यंतर नाही, प्रत्येकानी अडथळ्याची शर्यत पार करून सुखी जीवन जगावं अस आवाहन प्रा. डॉ. शिवाजी मोहाळे यांनी भूम येथील कार्यक्रमात बोलताना केले.
रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी श्री देवांग समाज चौंडेश्वरी देवी मंदिर ट्रस्टच्या नूतन वर्ष पूर्ती सोहळ्या निमित्त विविध क्षेत्रात राहून आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या उपस्थितीत प्रेरणादायी सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष उद्योजक अरुण बळीराम असलकर, प्रमुख अतिथी अंबाजोगाईचे वाहन निरीक्षक दत्तात्रय पांडकर, प्रा. डॉ. शिवाजीराव मोहाळे, धाराशिव व परभणी जिल्ह्याचे उद्योग उपसंचालक अमोल शिवलिंग बळे, भारतीय मानवाधिकार परिषदेचे राज्यस्तरीय सदस्य संदीप बागडेसर, भूम न्यायालयातील लघु लीपीक श्रीमती राणी हनुमंत बोत्रे, उद्योजक प्रकाश बागडे आदींची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी श्री देवांग समाजाच्या नूतन ट्रस्टने एक वर्षात केलेल्या कार्यपूर्तीच्या अहवाल सादरीकरण निमित्ताने समाजातील 45 वर्षापेक्षा अधिक व्यवसाय करत असलेल्या 28 व्यावसायिकांचा, सेवानिवृत्त झालेल्या 2 कर्मचाऱ्यांचा, मंदिरामध्ये दैनंदिन नित्य नियमाने आरती करणाऱ्या 33 भगिनींचा, पौष पौर्णिमा प्रत्येक महिन्याला साजरी करून जवळपास 300 नागरिकांचा महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करणाऱ्या 11 बांधवांचा, समाजातील उत्कृष्ट स्वयंपाक करणाऱ्या 5 आचारी महिलांचा, विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या 5 युवक युवतींचा तसेच इतरही सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या 7 बांधव, प्रगतशील शेतकरी 2 बांधवांचा प्रेरणादायी सन्मान करण्यात आला. सत्कार दरम्यान प्रत्येकाला आदिमाता श्री चौंडेश्वरी मातेची प्रतिमा तसेच समाजातील बांधवांचे जगण्याचे मूळ साधन असलेल्या हातमाग विणकाराची प्रतिमा भेट म्हणून प्रत्येकाला देण्यात आली. याचवेळी जानेवारी 2025 मध्ये साजरा करण्यात आलेल्या श्री चौंडेश्वरी देवी महोत्सवातील जमाखर्चाच्या पूस्तीकेचाही प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
याच कार्यक्रमापासून समस्त कोष्टी समाज बांधवांची भूम शहरा अंतर्गत जनगणना करण्याची मोहीम सुरू केली, यासाठीचे सर्व माहिती अंतर्भूत असलेले फॉर्म सर्वांना वाटप केले, अनेकांनी भरून दिलेले संकलित केले , त्याची नोंद समाजाच्या रेकॉर्डवर घेण्यात येणार आहे, तसेच समाजातील मयत झालेल्या व्यक्तीची नोंद समाजाच्या रेकॉर्डला ठेवून संबंधित कुटुंबाला मृत्यू प्रमाणपत्र दिले जाणार आहेत, याचीही सोय यावेळी पासून करण्यात आली.
याच कार्यक्रमातून ज्येष्ठ उद्योजक माजी ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब फलके, माजी सचिव सोपान वखडे, प्रकाश बागडे, अशोक बोत्रे, जयराज बागडे, उमेश ढगे, बंडू म्हेत्रेसर, चंद्रभुज पाकले, हिरालाल रोकडे यांचाही सन्मान करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमासाठी ट्रस्ट अध्यक्ष विठ्ठल बागडे, उपाध्यक्ष श्याम वारे, सचिव शंकर खामकर, सदस्य सागर टकले, नवनाथ रोकडे, योगेश आसलकर, अण्णासाहेब भागवत, सुहास खारगे, सुरज फलके, वैभव उपरे, सोमेश म्हैत्रे आदींनी परिश्रम घेतले.