तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रावण मास अखेरच्या टप्यात भाविकांची शंभूमहादेव अन्य देवतांचा दर्शनार्थ गर्दी होत आहे. येथील मठांमध्ये धार्मिक विधी मोठ्या प्रमाणात हजारो भाविकांचा सहभागाने संपन्न होत असल्याने तिर्थक्षेञ तुळजापूरात धार्मिकमय आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. श्रावणमासातील अखेरच्या
चौथ्या श्रावण सोमवारी श्री मुदगुलेश्वर शंभूमहादेव मंदीरात श्री मुद्गलेश्वरांची महाकाल अवतार महापूजा राञी मांडण्यात आली होती.
श्री सिद्धगरीबनाथ दशावतार मठ येथे अनादीकालापासून चालत आलेल्या श्रावण मासात सवालाख बेलपञ मंञोपचार गजरात अर्पण करण्याची परंपरा अखंड सुरु असुन या पार्श्वभूमीवर चौथ्या सोमवारी हजारो भक्तांना महाप्रसाद अन्नदान वाटप कार्यक्रम संपन्न झाला. श्रावण मासाच्या पहिल्या प्रथम दिनापासुन मंञोपचार गजरात सवालाख बेलपञ वाहण्यास आरंभ झाला होता. श्रावण मासात दररोज मंत्रोच्चाराच्या गजरात गरीबनाथ महाराजांच्या जिवंत समाधीवर असणाऱ्या महादेव पिंडींवर बेलपात्र अर्पण करतात. महिना भरात सवालाख तीनपानी बेलपञ अर्पण केले जातात.
सध्याचे महंत मावजीनाथ महाराजांच्या अधिपत्याखाली मंत्रोपचार, पोथीवाचन, धार्मिक अनुष्ठान व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त हजारो भाविकांनी समाधीस्थळ व मठ परिसरात गर्दी करून दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला. श्रावण महिन्यातील भक्तिभाव, मंत्रोच्चार आणि अन्नदान परंपरेने तुळजापूर मठात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले. चौय्था सोमवारी श्रीतुळजाभवानी मंदीरातील भवानीं शंकर, श्री बारालिंगेश्वर, सिंदफळ स्थित श्रीमुदगुलेश्वर, रामदरा तलावातील व पापनाश तिर्थकुंडातील शिवमंदीरात दर्शनार्थ शंभू भक्तांनी गर्दी केली होती.