तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील दुय्यम निबंधक कार्यालयात महसूल दिनानिमित्त वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला आहे. याअंतर्गत दस्त नोंदणीसाठी आलेल्या खरेदीदारांना वृक्ष भेट देऊन लागवडीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. अमृतराव, झाडपिडे, गाभणे सह अनेकांनी दस्त नोंदणी केली. त्यानंतर बालाजी मदसवार यांनी त्यांना वृक्ष भेट देऊन वृक्ष लावा, वृक्ष जगवा, नैसर्गिक समतोल साधा असे आवाहन केले.

याप्रसंगी सह दुय्यम निबंधक बालाजी मादसवार व कार्यालयातील एस. एस. कांबळे व व्ही. आर. गाते, कार्यालयातील आयटी ऑपरेटर प्रशांत गायकवाड, सुनील चव्हाण, पंढरीनाथ डोके तसेच दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.


 
Top