धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधन निमित्त आगळे वेगळ्या पद्धतीने वृक्षांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने प्रशालेतील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून बहीण भावाचे नाते घट्ट केले, तसेच विद्यार्थिनींनी शाळेच्या परिसरातील वृक्षांना राख्या बांधून वृक्ष संवर्धनासाठी कटिबद्ध असल्याचा कृतीतून संदेश दिला. शाळेच्या परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी आणि प्रशालेतील शिक्षकांनी लावलेल्या वृक्षांना राख्या बांधून विद्यार्थ्यांवर निसर्गा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.

 
Top