तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन गाभाऱ्यात सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी कालावधी वाढवण्यात आला आहे. पुरातत्व खात्यामार्फत हे काम 01 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाले असून, सुरुवातीला 10 ऑगस्ट पर्यंत काम पूर्ण होणार होते. मात्र, ठेकेदारांच्या माहितीनुसार काम पूर्ण होण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. म्हणून कालावधी 20 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्यात आला आहे.

या कालावधीत भाविकांना भवानीशंकर घाटी खालुन मुखदर्शन रांगेतुन दर्शन दिले जाणार आहे. या कालावधीत देवीची सिंहासन पूजा, अभिषेक पूजा व अन्य दैनंदिन धार्मिक विधी नित्योपचार पुजा चालु राहणार आहे. या कालावधीत धर्म दर्शन रांग, देणगी दर्शन रांग बंद असणार आहे. तरी भाविक भक्तांनी कृपया याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे.  असे आवाहन तहसीलदार तथा प्रशासक अरविंद बोळंगे यांनी केले आहे.

 
Top