तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुका प्रमुख अमोल जाधव यांची नियुक्ती होताच त्यांनी शिवसेनेच्या “गाव तिथे शाखा “ धडाका लावला असुन या उपक्रमाखाली फक्त एका दिवसात तब्बल ढेकरी, शिराढोण, कात्री, कामठा, जवळगा मेसाई आणि वडगाव देव या सहा गावांमध्ये शाखा काढुन शिवसेना तळागळा पर्यत पोहचविण्याचे काम करीत आहेत
पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, सचिव संजय मोरे, पालकमंत्री प्रताप सरनाईक, सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनेते ज्ञानराज चौगुले, जिल्हाध्यक्ष मोहन पनुरे आणि तालुकाध्यक्ष अमोल जाधव मिनाताई सोमाजी यांच्या उपस्थितीत भव्य पद्धतीने उद्घाटने पार पडली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम शिवसेनेची संघटना आणखी भक्कम करत असल्याचं स्पष्ट दिसतंय. शहराध्यक्ष बापूसाहेब भोसले, उपाध्यक्ष रमेश चिवचिवे यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यास साथ लाभत आहे. या शाखा धडाका पार्श्वभूमीवर बोलताना जाधव म्हणाले कि, ही फक्त सुरुवात आहे, खरी लढाई अजून बाकी आहे.
