धाराशिव (प्रतिनिधी) - खळबळ माजविणाऱ्या तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरण यामधील आरोपी अभिजीत अमृतराव यांचा जामीन मिळावा यासाठी ॲड अमोल वरुडकर यांनी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडत आर्थिक व्यवहाराची सत्यता मांडली. ॲड वरुडकर यांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश टी.जी. मिटकरी यांनी दि.11 ऑगस्ट रोजी जामीन मंजूर केला आहे.
तुळजापूर येथील एम.डी. ड्रग्स प्रकरणातील आरोपी असलेले अभिजीत अमृतराव यांच्या विरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 22/2025 नुसार गुन्हा नोंद झाला होता. अमृतराव यांच्यावतीने ॲड. वरुडकर यांनी जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ॲड. वरुडकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला तसेच आर्थिक व्यवहाराची खरी वस्तुस्थिती न्यायालयासमोर मांडली. ॲड. वरुडकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अभिजीत अमृतराव यांचा नियमित जामीन न्यायाधीश मिटकरी यांनी मंजूर केला. त्यामुळे अमृतराव यांना ड्रग्ज प्रकरणातून तूर्तास दिलासा मिळाला आहे.