भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील आरसोली जिल्हा परिषद शाळेतील जेष्ठ शिक्षक जिवन आगळे यांचा सेवापूर्ती निमित्ताने अधिकारी, शिक्षक, पदाधिकारी,पालक व माजी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत आरसोली येथे दि 29 ऑगस्ट रोजी सन्मान करण्यात आला.
या वेळी गटशिक्षण अधिकारी राहुल भट्टी, पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे, शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत साळुंखे, सोमनाथ टकले, अनिता जगदाळे, तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी जीवन आगळे यांनी केलेल्या कार्याचा गौरव करत शुभेच्छा दिल्या.
फुलांची उधळण करत सपत्नीक सत्कार व सन्मान करताना गावकरी मंडळी , विद्यार्थी व सहकारी मित्रांचे डोळे पाणावले. यावेळी केंद्रप्रमुख संजीवन खांडेकर, केंद्रीय मुख्याध्यापक बाळासाहेब कुटे, सरपंच सुशीलाताई पाटील, डीसीसी बँकेचे संचालक संजय पाटील, माजी सरपंच प्रशांत मुंडेकर,एपीआय धरणीधर कोळेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजकिरण गोयकर, उपाध्यक्ष अमोल खराडे, भाऊसाहेब कुलकर्णी, भागवत गोयकर, मुख्याध्यापक, शिक्षक, नागरिक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम थाटे यांनी तर आभार मुख्याध्यापक बाळासाहेब भगत यांनी मानले.