परंडा (प्रतिनिधी)- अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री परंडा कुर्डूवाडी रस्त्यावर घडली. संदीप ओभाळ (28) असे या अपघातात मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप ओभाळ हे पत्नीला रक्षाबंधनासाठी माहेरी सोडण्यासाठी परंडा येथे आले होते.परत जाताना शनिवारी रात्री परंडा कुर्डूवाडी-रस्त्यावर पाटील वस्ती येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली.या घटनेत संदीप ओभाळ यांचा मृत्यू झाला.ही घटना रविवारी पहाटे उघडकीस आली.संदीप यास शवविच्छेदना साठी परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अज्ञात वाहना विरुद्ध परंडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.